महिला वन-डे विश्वचषकचा थरार उद्यापासून रंगणार
दिसपूर, 29 सप्टेंबर (हिं.स.) महिला एकदिवसीय विश्वचषकाला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील उद्घाटन सामना गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. भारत या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. पण पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळल
आयसीसी विश्वचषक ट्रॉफीसह महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार


दिसपूर, 29 सप्टेंबर (हिं.स.) महिला एकदिवसीय विश्वचषकाला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील उद्घाटन सामना गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. भारत या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. पण पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळले जातील.

या स्पर्धेत २ नोव्हेंबरपर्यंत आठ संघांमध्ये ३१ सामने होतील. २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी दोन उपांत्य सामने होतील. अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला तर सामना कोलंबो खेळवला जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना सकाळी ११ वाजता सुरू होईल. या सामन्याव्यतिरिक्त सर्व सामने दुपारी ३ वाजता सुरू होणार आहेत.

यजमान भारत आणि श्रीलंका व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप सायकलच्या आधारे पात्रता मिळवली आहे. पाकिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, वेस्ट इंडिज, थायलंड आणि स्कॉटलंड यांच्यात पात्रता सामने खेळले गेले. त्यापैकी पाकिस्तान आणि बांगलादेश विश्वचषकासाठी पात्र ठरले.२००० नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडिज महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरू शकलेला नाही. चांगल्या रनरेटमुळे बांगलादेशने पात्रता सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजला मागे टाकले.

स्पर्धेत आठ संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघ राउंड-रॉबिन स्वरूपात एकमेकांविरुद्ध सात सामने खेळतील. २६ ऑक्टोबरपर्यंत २८ सामने खेळले जातील. सर्व सामन्यांनंतर पॉइंट टेबलमधील अव्वल चार संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचतील.पहिल्या उपांत्य सामनय्याक नंबर १ संघ हा नंबर ४ संघाशी सामना करेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा संघ दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एकमेकांशी सामना करतील. अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी होईल.

विश्वचषकाचे भारतातील सामने हे चार ठिकाणी होणार आहेत. गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम आणि नवी मुंबई येथे हे सामने होणार आहेत. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवले जातील. जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला तर एक उपांत्य फेरी आणि अंतिम सामना तेथे खेळवला जाईल. जर पाकिस्तान बाद फेरीत पोहोचू शकला नाही तर सामने नवी मुंबईत होतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी बक्षीस रकमेत मागील स्पर्धेच्या तुलनेत चार पट वाढ केली आहे. या स्पर्धेतील संघांमध्ये १३.८८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे १२२ कोटींची रक्कम देण्यात येणार आहे. ही बक्षीसाती रक्कम पुरुष विश्वचषकापेक्षा ३९ कोटींनी जास्त आहे.

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची ही भारताची चौथी वेळ आहे. भारताने १९७८, १९९७ आणि २०१३ मध्ये विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. टीम इंडिया तिन्ही वेळा अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही. भारत २००५ आणि २०१७ मध्ये दोनदा अंतिम सामना खेळला होता. पण दोन्ही वेळा पराभूत झाला.

सात वेळा विजेता ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार आहे. ते गतविजेते देखील आहेत. ऑस्ट्रेलियाला पराभूत करणाऱ्या संघाला विजेतेपद जिंकण्याची सर्वोत्तम संधी असेल. अलिकडच्या वर्षांत इंग्लंड आणि भारत महिलांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार लढत त्यांना दिली आहे. त्यामुळे हे तिन्ही संघ विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये फारशी स्पर्धा नसली तरी, दोन्ही देशांमधील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता हा सामना खूप तणावपूर्ण असणार आहे. दोन्ही संघ ५ ऑक्टोबर रोजी कोलंबोमध्ये भिडतील. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाने सर्व एकदिवसीय सामने जिंकले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande