एका चॅम्पियन संघाला ट्रॉफी नाकारताना पहिल्यांदाच पाहिले-सूर्यकुमार यादव
अबुधाबी, २९ सप्टेंबर (हिं.स.) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आशिया कप फायनलनंतर एक अभूतपूर्व घटना घडली. विजेतेपद जिंकूनही, भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. कारण क्रिकेटपटूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमं
भारतीय क्रिकेट संघ


अबुधाबी, २९ सप्टेंबर (हिं.स.) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आशिया कप फायनलनंतर एक अभूतपूर्व घटना घडली. विजेतेपद जिंकूनही, भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. कारण क्रिकेटपटूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून ती स्वीकारण्यास नकार दिला.

भारताने पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभूत करून नवव्यांदा आशिया कप जिंकल. पण विजयानंतर ट्रॉफी आणि पदके वाटण्यात आली नाहीत.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, मी क्रिकेट खेळायला आणि पाहण्यास सुरुवात केल्यापासून, मी कधीही चॅम्पियन संघाला ट्रॉफी नाकारताना पाहिले नाही. हा आमचा कष्टाचा पैसा आहे आणि आम्ही तो पात्र होतो. माझ्यासाठी खरी ट्रॉफी म्हणजे माझ्या ड्रेसिंग रूममधील १४ क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफ.

सूर्यकुमारने आशिया कपमधील त्याच्या सर्व सामन्यांमधील त्याचे शुल्क भारतीय लष्कराला देण्याची घोषणाही केली. तो म्हणाला, या स्पर्धेत मिळवलेले माझे सर्व सामन्याचे शुल्क मी भारतीय लष्कराला देऊ इच्छितो.सामना संपल्यानंतर, भारतीय संघ सुमारे दीड तास ट्रॉफीची वाट पाहत होता. पण कोणतेही बक्षीस वाटले गेले नाही. रात्री उशिरा क्रिकेटपटू स्टेजवर आले आणि त्यांनी त्यांचा विजय साजरा केला.

यावर सूर्यकुमार हसला आणि म्हणाला, आम्ही विजयी उत्सव साजरा करण्यासाठी दीड तास वाट पाहिली. 'चॅम्पियन्स' बोर्डही आले आणि नंतर परत गेले. मी तेही पाहिले.पत्रकार परिषदेदरम्यान, एका पाकिस्तानी पत्रकाराने टीम इंडियाच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यावर राजकारण आणि खेळ मिसळल्याचा आरोप केला. याव र सूर्यकुमारने हसून उत्तर दिले, तुम्हाला राग येतोय का?बीसीसीआयने एसीसीला आधीच कळवले होते की संघ नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही, असे विचारले असता, तो म्हणाला, आम्ही हा निर्णय मैदानावरच घेतला. आम्हाला कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande