छत्रपती संभाजीनगर, 3 सप्टेंबर (हिं.स.)।डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवासाठी आतापर्यंत ३४४ महाविद्यालयांची ऑनलाईन नोंदणी केली आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव यंदापासून जिल्हानिहाय होणार आहे. गणेश उत्सवानंतर ८ ते ३० सप्टेंबर या काळात महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून यजमानपदासाठी प्रत्येक जिल्हयात एक महाविद्यालय निवडण्यात आले आहे.युवक महोत्सवाच्या तयारीसाठी कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाच्या आयोजनाबाबत तयारी सुरू आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव चारही जिल्यात युवक महोतसवाचे आयोजन केल्यानंतर लगेच ’केंद्रीय युवक महोत्सव’ घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गुणानुक्रमे पहिले तीन संघ केंद्रीय महोत्सवात सहभागी होतील. जिल्हा महोत्सव संलग्नित महाविद्यालयात तर केंद्रीय महोत्सव विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर या मुख्य कॅम्पस मध्ये घेण्यात येणार आहे. युवक महोत्सवासाठी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन ठेवण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis