सरकाने प्रमाणपत्र वाटप करण्यात अडचण आणून फसवणूक करू नये -अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर, 3 सप्टेंबर (हिं.स.)।डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन,अशा शब्दांत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी आपली प्रतिक्रिया नोंदवली.मराठा आरक्षण प्राथमिक सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे मुंबई
अंबादास दानवे


छत्रपती संभाजीनगर, 3 सप्टेंबर (हिं.स.)।डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन,अशा शब्दांत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी आपली प्रतिक्रिया नोंदवली.मराठा आरक्षण प्राथमिक सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे मुंबईतील उपोषण जरांगे यांनी मागे घेतले. त्यानंतर दानवे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.

मराठा समाजाचा आरक्षण लढाईचा महत्त्वाची लढाई आज समाजाने जिंकली! असे ते म्हणाले. यांचे संपूर्ण श्रेय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांना तसेच त्यांना साथ देणाऱ्या गोर गरीब जनतेला जाते.

एक सामान्य माणूस अख्या व्यवस्थेला पुरून उरत, व्यवस्थेला झुकवून टाकतो. सरकारचे कट कारस्थान हाणून पाडतो. आता फक्त सरकाने प्रमाणपत्र वाटप करण्यात अडचण आणून फसवणूक करू नये हि माफक अपेक्षा. आणि शेवटचं मराठा आरक्षणाचं सर्व श्रेय हे जरांगे पाटलांच आणि त्यांच्या पाठीमागं राहणारा समाजाच!असे दानवे म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande