छत्रपती संभाजीनगर, 3 सप्टेंबर (हिं.स.)।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये स्व.गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या भटक्या विमुक्तांच्या समस्या आणि आव्हाने या विषयावरील परिसंवादात अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रवीण घुगे हेही या परिसंवादात सहभागी झाले होते. त्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी उपस्थित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, संस्थेचे संचालक डॉ. संजय साळुंखे, महाराष्ट्र भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यवाह डॉ. संजय पुरी, परीक्षा संचालक डॉ. डोळे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis