ऋषी कपूर यांच्या जयंतीनिमित्त आलिया भट्टने शेअर केली पोस्ट
मुंबई, 4 सप्टेंबर (हिं.स.)।बॉलीवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची आज(४ सप्टेंबर) जयंती आहे. ऋषी कपूर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांची सून आलिया भट्टने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर के
आलिया भट्टने


मुंबई, 4 सप्टेंबर (हिं.स.)।बॉलीवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची आज(४ सप्टेंबर) जयंती आहे. ऋषी कपूर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांची सून आलिया भट्टने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ऋषी कपूर स्टेजवर एक मजेशीर किस्सा सांगताना दिसत आहेत. आणि ऑडियन्समध्ये नीतू कपूर बसलेल्या दिसतात. त्या किस्सा ऐकून हसताना दिसतात. आलियाने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे, “नेहमी आणि सदैव आम्ही तुम्हाला आठवत राहू… हॅप्पी बर्थडे.” आलियाचा हा पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ऋषी कपूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी देखील इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलं,“तुम्ही नेहमी आमच्या हृदयात राहाल… हॅप्पी बर्थडे.” नीतू कपूर यांच्या या पोस्टवर आलियाने हार्ट इमोजी टाकून प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी देखील त्यांना आठवत, कमेंट्स केल्या आहेत. संजय कपूर यांनी लिहिलं, “जन्मदिवसाच्या शुभेच्छा चिंटू. तू नेहमी लक्षात राहशील. तुझ्यासोबत काम करण्याचा सन्मान मला लाभला.” ऋषी कपूर यांचं निधन ३० एप्रिल २०२० रोजी झालं होतं. ते दोन वर्षांपासून ल्युकेमिया (एक प्रकारचा रक्ताचा कॅन्सर) या आजाराशी लढा देत होते. त्यांचं न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू होते. एक वर्ष उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते. ऋषी कपूर शेवटचं ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटात दिसले होते. त्यांनी या चित्रपटाचे अर्धे शूटिंग पूर्ण केलं होतं. मात्र त्यांच्या निधनानंतर, चित्रपटात अर्ध्या भागात ऋषी कपूर आणि उरलेल्या भागात परेश रावल झळकले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande