मराठी अभिनेता उपेंद्र लिमये यांनी घेतली रजनीकांत यांची भेट
मुंबई, 4 सप्टेंबर (हिं.स.)।दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत. या ग्रेट कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या या थलावयाची एकदा तरी भेट व्हावी अशी प्रत्येक च
मराठी अभिनेता उपेंद्र लिमये यांनी घेतली रजनीकांत यांची भेट


मुंबई, 4 सप्टेंबर (हिं.स.)।दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत. या ग्रेट कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या या थलावयाची एकदा तरी भेट व्हावी अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. अशातच मराठी अभिनेता उपेंद्र लियमेची हि इच्छा पूर्ण झाली आहे. कारण रजनीकांत यांची भेट घेण्याचा योग उपेंद्र लिमये यांच्या नशिबात आला आहे.

नुकतंच उपेंद्र लिमयेंनी रजनीकांत यांची भेट घेतली. थलायवाला पाहून उपेंद्र लिमयेंचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रजनीकांत यांच्या सोबतचा फोटो शेअर करत त्यांनी पोस्ट लिहिली कि, साक्षात दक्षिण चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय देवाची प्रत्यक्ष भेट. उपेंद्र लिमये यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रजनीकांत यांना भेटण्याचा आनंद अभिनेत्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

उपेंद्र लिमये यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. तर सेलिब्रिटींनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मुक्ता बर्वेसह जितेंद्र जोशी, किरण गायकवाड, दिपाली सय्यद, सुयश टिळक, सिद्धार्थ बोडके यांनीही या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande