* विविध प्रकल्पांमुळे 71,343 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह, 62,405 रोजगारांचीही निर्मिती होणार
* बिडकिन औद्योगिक क्षेत्रात 49 सूक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योग, 27 मोठे प्रकल्प आणि 4 बिगर सूक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योगांना भूखंडांचे वाटप
छत्रपती संभाजीनगर मधील ऑरिक (शेंद्रा-बिडकिन औद्योगिक क्षेत्र) अर्थात औरंगाबाद औद्योगिक शहराला सहा वर्ष पूर्ण झाली. ऑरिकचा सहावा वर्षपूर्ती सोहळा म्हणजे औद्योगिक प्रगती, जागतिक गुंतवणूक आणि शाश्वत प्रगतीच्या गौरवाचा सोहळा आहे. ऑरिक हे राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास कार्यक्रमांतर्गत (NICDP) विकसित केले गेलेले भारतातील पहिल्या हरित क्षेत्र औद्योगिक स्मार्ट शहरांपैकी एक शहर आहे.
ऑरिक : प्रगती आणि प्रभाव
* या सहा वर्षांमध्ये, औद्योगिक आणि संमिश्र हेतूने वापर (mixed-use) या दोन्ही श्रेणींअंतर्गत 3,029 एकर औद्योगिक जमीन आणि 117 एकर मिश्र-वापर जमिनीवर इतक्या क्षेत्राच्या एकूण 323 भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. या प्रकल्पांअंतर्गत एकूण 71,343 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची तर 62,405 इतक्या संख्येने रोजगार (थेट आणि अप्रत्यक्ष) निर्मितीची क्षमता आहे.
* सध्या, 78 युनिट्स कार्यरत असून, 62 कारखान्यांच्या उभारणीचे काम सुरू आहे, तर 184 युनिट्सच्या बांधकामाची तयारी सुरू आहे.
सहा वर्षांतील यश
* शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात 135 सुक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योगांना, 17 मोठ्या प्रकल्पांना, आणि 16 बिगर लघु आणि मध्यम उद्योगांना भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे (यात भारतात आपला पहिला स्पँडेक्स प्रकल्प सुरू करणाऱ्या दक्षिण कोरियाच्या ह्योसंग (Hyosung) यासारख्या महत्त्वाच्या गुंतवणूकीचाही अंतर्भाव आहे.).
* बिडकिन औद्योगिक क्षेत्रात 49 सुक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योगांना, 27 मोठ्या प्रकल्पांना आणि 4 बिगर सुक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योगांना भूखंडांचे वाटप झाले आहे. या औद्योगिक क्षेत्रात मोटार वाहन, इलेक्ट्रिक वाहने, पॉलिमर, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील जागतिक कंपन्या उभ्या राहात आहेत.
* ऑरिकमधील औद्योगिक जमिनीचे वाटप जवळपास पूर्ण झाले असून, यावरून इथल्या पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक आराखड्यावरचा गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो.
* वैशाली अजित देशपांडे (अनुकूल पॉवर इंजिनिअर्स प्रा. लि.), डॉ. हर्षाली संदीप देशमुख (टर्बोनोवा पॉलिमर प्रा. लि.) आणि पायल नाईकवाड (रेयॉन इल्युमिनेशन्स अँड एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि.) यांसारख्या महिला उद्योजकांनी सर्वसमावेशक प्रगतीचे उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे.
* कर्मचाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठी आणि त्यांच्या कौशल्यांना उद्योग क्षेत्राअंतर्गत सामावून घेण्याच्या उद्देशाने भारतीय उद्योग महासंघासोबतच्या भागीदारीत ऑरिक इथे 20,000 चौरस फूट क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे.
* ऑरिक इथे 1 एप्रिल 2025 पासून सुक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योगांकरता कार्यालयीने जागेच्या भाड्याच्या दरांमध्ये तब्बल 50% कपात करून ते, 50 रुपये प्रति चौरस फूटावरून 25 रुपयांपर्यंत कमी केले आहे.
सायकल फेरीमार्ग पूर्ण केल्यानंतर डॉ. मांडवीय म्हणाले, रविवारच्या सायकल फेरी कार्यक्रमाला आपल्या नागरिकांचा वाढता सहभाग पाहून मला आनंद होत आहे. ही आता लोक चळवळ म्हणून विस्तारत आहे आणि सक्रीय जीवनशैलीचा स्वीकार करण्याविषयी लक्षणीय जागरूकता निर्माण करत आहे. आज, मी खासदारांसमवेत 'गर्व से स्वदेशी'या संकल्पनेअंतर्गत सायकलिंग केले. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना भारतीय बनावटीची उत्पादने (मेड इन भारत) वापरण्याचे आवाहन करतो.
क्रीडा साहित्यावरील अलीकडेच झालेल्या जीएसटी कपातीविषयी बोलताना डॉ. मांडवीय म्हणाले, बहुतांश क्रीडा साहित्यावरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)12 टक्क्यांवरून 5 टक्के केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही आभार मानतो.यामुळे नागरिकांना या वस्तू परवडतील आणि त्यांना क्रीडा आणि तंदुरूस्तीशी निगडीत कार्यक्रमांमध्ये अधिक सक्रियतेने सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल. तसेच अधिक मागणीमुळे भारतीय क्रीडा साहित्य उत्पादन केंद्रांचे उत्पादन वाढेल आणि क्रीडा परिसंस्था भक्कम होईल.
युवा व्यवहार आणि क्रीडा राज्य मंत्री रक्षा निखिल खडसे यांनी एक्स या त्यांच्या समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हणतात, दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीयजी यांच्या नेतृत्वाखालील तंदुरूस्तीची उल्लेखनीय चळवळ असलेल्या #SundaysOnCycleच्या 39 व्या आवृत्तीत सहभागी होण्याची संधी लाभली .
या कार्यक्रमात, सर्व सन्माननीय खासदार, ऑलिम्पिक विजेती साक्षी मलिक आणि साई संघटनेतील आणि भारतीय रेल्वेतील मान्यवर या कार्यक्रमात एकत्र आले आणि एकतेचे दर्शन घडवले. आम्ही, आत्मनिर्भर आणि तंदुरूस्त भारताप्रति आमची वचनबद्धता दृढ करतानाच एकत्रितपणे #गर्वसेस्वदेशीची प्रतिज्ञा घेतली.
ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकने संडेज ऑन सायकल चळवळीत सहभाग नोंदवल्यानंतर आनंद व्यक्त केला. देशातील नागरिकांमध्ये तंदुरूस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंना देशासाठी पदक मिळवून देण्यासाठी सरकारकडून होत असलेले प्रयत्न तिने अधोरेखित केले.
या प्रदेशाला बहुआयामी संपर्कयोजनेचा लाभ मिळत असून त्यामध्ये समृद्धी महामार्ग, प्रस्तावित संभाजीनगर–पुणे ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे, जालना ड्राय पोर्ट, औरंगाबाद विमानतळाशी जवळीक तसेच महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचा समावेश आहे. पंतप्रधान गतिशक्ती योजनेशी सुसंगत असलेल्या या संपर्क उपक्रमांमुळे दळणवळण कार्यक्षमता वाढली असून ऑरिक हे एक स्पर्धात्मक गुंतवणूक केंद्र बनले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ऑरिक हा दिल्ली–मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा अविभाज्य घटक असून, त्यामुळे त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारांशी अधिक दृढ नाते जोडले गेले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर प्रमुख उत्पादन व गुंतवणूक केंद्र म्हणून अधिक प्रस्थापित होत आहे.
ऑरिकसाठी गुंतवणूकदारांना सहाय्य करण्याकरिता सतत उच्चस्तरीय संवाद साधला जातो. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि डीपीआयआयटी ( डीपीआयआयटी) चे सचिव अमरदीपसिंह भाटिया यांनी गुंतवणूकदारांशी संवाद साधण्यासाठी तसेच प्रत्यक्ष प्रगतीचा आढावा घेण्यासाठी भेटी दिल्या आहेत. यामुळे समस्यांचे वेळेवर निराकरण होत असून व्यवसाय सुलभतेत सातत्याने सुधारणा घडवून आणली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 सप्टेंबर 2019 रोजी ऑरिक सिटीचे उद्घाटन केले. त्याच दिवशी सहा मजली ऑरिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले, जे या स्मार्ट सिटीचे प्रशासकीय आणि देखरेख केंद्र म्हणून कार्यरत असून तंत्रज्ञानाधारित प्रशासन आणि ‘व्यवसाय सुलभता ’ प्रति बांधिलकीचे प्रतीक आहे.
ऑरिक हे 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या महाराष्ट्राच्या ध्येयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सशक्त पायाभूत सुविधा, नामांकित गुंतवणूकदार आणि रोजगारनिर्मितीमुळे ऑरिक ‘विकसित भारत @ 2047’ या राष्ट्रीय दृष्टिकोनातही हातभार लावत आहे. या शहराने मराठवाड्यासाठी उत्पादन, निर्यात व नवनिर्मिती यांची समृद्ध परिसंस्था उभी केली असून, केवळ सहा वर्षांत ऑरिक हे औद्योगिक स्मार्ट सिटींसाठी एक आदर्श ठरले आहे.
ऑरिक विषयी
ऑरिक ही दिल्ली–मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत विकसित केलेली ग्रीनफिल्ड औद्योगिक स्मार्ट सिटी आहे. तिचे व्यवस्थापन महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (एमआयटीएल) या विशेष उद्देशाने स्थापन केलेल्या कंपनीकडे असून ती भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे.
शेंद्रा व बिडकीन (ऑरिक) येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, मोठ्या सलग जमिनीचे तुकडे, ‘प्लग-अँड-प्ले’ सुविधा आणि एक खिडकी मंजुरी प्रणाली उपलब्ध असून, देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित केले जात आहे. येथे विशेषतः वाहन उद्योग , अभियांत्रिकी, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, कापड, अन्न प्रक्रिया आदी क्षेत्रांवर भर दिला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी