
लातूर, 12 जानेवारी (हिं.स.)।आगामी महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर लातूर शहर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी १८ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली असून त्यांचे प्राथमिक सदस्यत्व ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे.
नेमकी कारवाई का झाली?
पक्षाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रक्रियेत या पदाधिकाऱ्यांकडून पक्षशिस्त, धोरणे आणि निर्णयांचे पालन होणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाच्या संघटनात्मक शिस्तीला बाधा निर्माण होत असल्याचे समोर आले. यासंदर्भात भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन हा कठोर निर्णय घेण्यात आला.
निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी:
अ.क्र. पदाधिकाऱ्याचे नाव अ.क्र. पदाधिकाऱ्याचे नाव
१ श्री. अजय कोकाटे १० श्री. श्रीकांत रांजणकर
२ श्री. किशोर कवडे ११ श्री. वैभव बनारसे
३ श्री. संदीप सोनवणे १२ श्री. भरत भोसले
४ श्री. अशोक ताकतोडे १३ श्री. विशाल हावा पाटील
५ श्री. दिलीप बेलूरकर १४ श्री. श्रीनिवास लांडगे
६ श्री. दीपक कांबळे १५ श्री. गणेश हेड्डा
७ श्री. महेश झंवर १६ श्री. संगीत रंदाळे
८ श्री. पृथ्वीसिंह बायस १७ श्री. वल्लभ वावरे
९ श्री. शिवसिंह सिसोदिय १८
पक्षाचा कडक इशारा
हा निर्णय पक्षहित आणि संघटनात्मक शिस्त लक्षात घेऊन घेण्यात आला असून तो तात्काळ लागू करण्यात आला आहे, असे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणावर पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis