पुणे - दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांवर कारवाई होणार
पुणे, 13 जानेवारी, (हिं.स.) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांवर कारवाई करण्यात येणार आहे . त्यानुसार राज्यभरातील दहावीची ३१, बारावीची ७६ केंद्रांची मान्यत
पुणे - दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांवर कारवाई होणार


पुणे, 13 जानेवारी, (हिं.स.) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांवर कारवाई करण्यात येणार आहे . त्यानुसार राज्यभरातील दहावीची ३१, बारावीची ७६ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली असून, कारवाई करण्यात आलेली सर्वाधिक परीक्षा केंद्रे छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत.

राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५च्या परीक्षेत राज्यभरात एकूण ३४ केंद्रांवर भरारी पथकांमार्फत गैरप्रकारांची प्रकरणे आढळून आली. त्यापैकी पुणे विभागातील सात, नागपूर विभागातील सहा, छत्रपती संभाजीनगर विभागातील १०, मुंबई विभागातील एक, लातूर विभागातील सात, अशा एकूण ३१ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. कोकण, नाशिक, कोल्हापूर, अमरावती या विभागातील एकही केंद्र नाही.दहावी, बारावीच्या परीक्षेवेळी ज्या केंद्रांवर भरारी पथकाने भेट देऊन कॉपी प्रकरणे उघडकीस आणली, त्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande