
लातूर, 13 जानेवारी (हिं.स.)लातूर शहराच्या प्रलंबित प्रश्नांची जाण केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी लातूरकरांनी भाजपाला कौल द्यावा, असे खणखणीत आवाहन औसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रभाग १७ मधील जाहीर सभेत केले.
सभेतील महत्त्वाचे मुद्दे:
पाणीप्रश्नावर ठोस उपाय: पाणी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २५९ कोटी रुपये मंजूर होणार; शहरात ६ नवीन पाण्याच्या टाक्या उभारणार!
दळणवळण व आरोग्य: लातूरसाठी नवा महामार्ग मंजूर आणि जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी जागेचे हस्तांतरण पूर्ण.
लाडकी बहीण योजना: जोपर्यंत देवाभाऊ आहेत, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकत नाही! - काँग्रेसच्या अडवणुकीच्या राजकारणावर जोरदार प्रहार.
स्मार्ट लातूर: लातूरच्या 'एज्युकेशन पॅटर्न'ला आता 'स्मार्ट सिटी'ची जोड देणार - बस्वराज पाटील मुरुमकर.
समांतर रस्त्याचा मुद्दा: राम मंदिराचे काम पूर्ण झाले, पण विरोधकांच्या दिरंगाईमुळे शहरातील समांतर रस्ता अजूनही रखडलेलाच - अरविंद पाटील निलंगेकर.
आपले उमेदवार, आपला विकास!
प्रभाग १७ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार अनंत गायकवाड, संगीता मिरचे आणि शोभा पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis