उमेदवारांना बहुमताने विजयी करा; शेवटच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा चंद्रपुरात प्रचार
चंद्रपूर/मुंबई, 13 जानेवारी, (हिं.स.)। भारतीय जनता पक्ष व असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष हे धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राजकीय स्वार्थ साधत आहेत. हिंदु मुस्लीम, मराठा-ओबीसी वाद निर्माण करून जनतेची माथी भडकवतात आणि सत्तेसाठी मात्र एकत्र येतात. ह
चंद्रपूर/मुंबई


चंद्रपूर/मुंबई, 13 जानेवारी, (हिं.स.)। भारतीय जनता पक्ष व असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष हे धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राजकीय स्वार्थ साधत आहेत. हिंदु मुस्लीम, मराठा-ओबीसी वाद निर्माण करून जनतेची माथी भडकवतात आणि सत्तेसाठी मात्र एकत्र येतात. हिरव्या पतंगाचा मांजा भगवा आहे तर धनुष्याचा बाण हिरवा आहे. या ढोंगी भाजपा, शिंदेसेना व एमआयएमला महानगरपालिका निवडणुकीत धडा शिकवा व काँग्रेसला बहुमताने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

महानगरपालिका निवणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रपूरात प्रचार केला. यावेळी विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर आडबाले, माजीमंत्री वसंत पुरके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार सुभाष धोटे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष संतोष लहानगे व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व ओवैसी यांचा एमआयएम पक्ष दोघेही हिंदू मुस्लीमच्या नावावर लोकांमध्ये दहशत माजवत आहेत पण सत्तेची मलई खाण्यासाठी मात्र एकत्र येतात हे दिसून आले आहे. अकोट मध्ये भाजपा व एमआयएम सत्तेसाठी एक झाले. एमआयएमशी युती कधीच करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छाती ठोकून सांगतात पण अकोटमधील युती काही तोडत नाहीत व त्यांच्यावर कारवाईही करत नाहीत, कारण हे दोन्ही पक्ष एकच आहेत. या सत्तेच्या साठमारीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही मागे नाही, त्यांनीही बीड जिल्ह्यात परळी नगरपालिकेत एमआयएमचा हात हाती घेतला. जनतेमध्ये दहशत माजवून सत्तेसाठी गळ्यात गळे घालणाऱ्या या ढोंगी लोकांना आता धडा शिकवा, असे आवाहन करताना सपकाळ म्हणाले की, तू इधर उधर की न बात कर, मुझे रहज़नों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसने ७० वर्षात काय केले असा प्रश्न विचारणारा भाजपा काँग्रेसने जे निर्माण केले आहे ते विकण्याचे काम करत आहेत. चंद्रपूर शहरात रस्त्यावर सगळीकडे खड्डे आहेत, पाणी मिळत नाही शहराची अवस्था अत्यंत वाईट केली आहे. पराभव दिसत असल्याने भाजपा तीन तीन हजारांची पाकिटे वाटत आहे. चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता आल्यास शहरात सुसज्ज रुग्णालये उभारु, किमान १० इंग्रजी शाळा सुरु करु, पिण्याच्या पाणी मुबलक देऊ. जनता काँग्रेस पक्षाच्या सोबत आहे, चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे ४० नगरसेवक विजयी होतील व महानगरपालिकेवर काँग्रेस विजयी झेंडा फडकणार असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande