
सोलापूर, 13 जानेवारी (हिं.स.)सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदार संघासाठीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. या याद्या जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघ निहाय सहा. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच सदरच्या याद्या जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या संकेतस्थळावर देखील पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरु असून, ज्या पदवीधर व शिक्षक मतदारांनी अद्याप नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जावून मतदार नोंदणी करून घ्यावी. तसेच, संबंधित तहसिल कार्यालय व पदनिर्देशित अधिकारी कार्यालय येथे ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड