
बँकॉक, 14 जानेवारी (हिं.स.)।थायलंडची राजधानी बँकॉक येथे ट्रेन रुळावरून घसरून अपघात घडला आहे.या भीषण अपघातात किमान २२ जणांचा मृत्यू झाला असून, ३० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, ही दुर्घटना बुधवारी सकाळी नाखोन रत्चासिमा प्रांतातील सिखियो जिल्ह्यात घडली. हे ठिकाण बँकॉकपासून सुमारे २३० किलोमीटर ईशान्येला आहे. संबंधित ट्रेन उबोन रत्चथानी प्रांताकडे जात होती.यावेळी ट्रेनच्या एका डब्यावर बांधकामासाठी वापरली जाणारी एक क्रेन कोसळली .नाखोन रत्चासिमा प्रांताचे स्थानिक पोलीस प्रमुख थचापोन चिन्नावोंग यांनी सांगितले,“या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत.”स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावर काम करणारी एक क्रेन कोसळून जात असलेल्या ट्रेनवर आदळली. त्यामुळे ट्रेन रुळावरून घसरली आणि काही काळासाठी तिला आग लागली. पोलिसांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्यात आली असून बचावकार्य सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode