
सोलापूर, 15 जानेवारी (हिं.स.)। मोहोळ तालुक्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. माजी सभापती विजयराज डोंगरे आणि त्यांच्या लोकशक्ती परिवाराने भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे.
बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत डोंगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हातात घड्याळ बांधत राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे मोहोळसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विजयराज डोंगरे हे मोहोळ तालुक्यात प्रभावी नेतृत्व मानले जात असून त्यांच्या लोकशक्ती परिवाराची ग्रामीण भागात मजबूत पकड आहे. त्यांच्या भाजपातून बाहेर पडण्यामुळे आगामी झेडपी निवडणुकीत भाजपाच्या ताकदीला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड