
चंद्रपूर, 15 जानेवारी (हिं.स.)।चंद्रपूर मनपा निवडणूकीत चंद्रपूर मतदारसंघात सकाळी ९.३० वाजेपर्यंत ०६.४६ टक्के मतदान झालेले आहे. यात पुरुष मतदार ११,७०३, महिला मतदार ७६६५ अश्या एकुण १९,३६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीत मतदान काळात चंद्रपूरच्या काही मतदान केंद्रांवर मतदार याद्यांचा घोळ सुरु - ऑनलाईन नाव दिसूनही केंद्रांवर यादीत नाव नसल्याचं उघड अश्या आशयाची बातमी काही वृत्त वाहिनींवर आली होती. त्यानुसार तक्रार करण्यात आलेल्या याद्यांची तपासणी प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. तसेच मतदान केंद्र अथवा यादीत नाव सापडत नसल्यास टोल फ्री क्रमांक १८००३०९७०४० व व्हॉट्सअँप क्रमांक ९०११०९५१६८ या क्रमांकावर तक्रार करता येत असल्याचे प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव