
चंद्रपूर, 15 जानेवारी (हिं.स.)। लोकशाही सशक्त करण्यासाठी नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हा लोकशाहीचा कणा असून, प्रत्येक मतातून विकास, सुशासन आणि जनहिताची दिशा ठरते. याच जाणीवेतून आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरातील समित्र शाळा येथील मतदान केंद्रावर सहपरिवार उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदान करणे म्हणजे केवळ अधिकार नसून लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे, विचारपूर्वक आणि कुटुंबासह मतदान करून लोकशाही अधिक मजबूत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव