सध्या महापालिका निवडणुकांमध्ये इतर पक्ष अदृश्य - नीलम गोऱ्हे
पुणे, 15 जानेवारी, (हिं.स.)। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील तिन्ही मित्रपक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणामध्ये उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालानंतर पुन्हा युतीतील हे पक्ष एकत्र येतील अशी चर्चा असतानाच खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आ
nilam Gore


पुणे, 15 जानेवारी, (हिं.स.)। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील तिन्ही मित्रपक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणामध्ये उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालानंतर पुन्हा युतीतील हे पक्ष एकत्र येतील अशी चर्चा असतानाच खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आम्हाला कोणाची गरज पडणार नाही. आमचा स्वबळावर महापौर होईल असं सांगितलं आहे. यानंतर शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याला उत्तर दिले आहे.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, खूप प्रसन्न वाटतेय कारण पहिल्यांदा घराजवळच्या मतदार केंद्रामध्ये धनुष्यबाणावर मतदान करण्याची संधी मिळाली आहे. सध्या महापालिका निवडणुकांमध्ये इतर पक्ष अदृश्य आहेत, आमच्या दोघांमध्ये चुरस आहे असा दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेक ठिकाणी पैशाचा वापर होत असल्याचा देखील बोलले जात आहे त्याच्यावर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक निकालाबाबत काही अंदाज व्यक्त केला आहे. त्यामध्ये मुंबई येथे भाजपला 90 तर शिंदेच्या सेनेला 40 जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे म्हणल्या, घोडा मैदान जवळ आहे. उद्या सगळं कळेल. मात्र मतदान होण्यापूर्वीच अशा प्रकारचे अंदाज वर्तवले जातात कारण इतर उमेदवार आणि मतदारांनी खचावे म्हणून असं केल जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande