
छत्रपती संभाजीनगर, 15 जानेवारी (हिं.स.)।यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील वाचन संकल्प उपक्रमाद्वारे आयोजिण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.
सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. गंगाधर मोरे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.देविदास वाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात राजमाता जिजाऊ संदर्भित राजमाताजिजाऊ, जिजाऊ द मदर ऑफ द गुरुज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सारखे पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर कर्मयोग, व्यक्ती व्यक्तिमत्व विकास, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग, विवेकलहरी, ग्रंथावलीचे खंड, अग्निमंत्र, आत्मनुभूती, तरुणांना यासारखे अनमोल ग्रंथ प्रदर्शनात वाचकांना मिळाली. प्रदर्शनास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis