'मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' यंदा प्रख्यात विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना जाहीर
छत्रपती संभाजीनगर, 15 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर वर्धापन दिनाच्या निमित्ताने मिलिंद महाविद्यालयातर्फे दिला जाणारा ''मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार'' यंदा प्रख्यात विचारवंत डॉ. आ
'मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' यंदा प्रख्यात विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना जाहीर


छत्रपती संभाजीनगर, 15 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर वर्धापन दिनाच्या निमित्ताने मिलिंद महाविद्यालयातर्फे दिला जाणारा 'मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' यंदा प्रख्यात विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना जाहीर झाला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी समतेच्या चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनवादी विचारांच्या चळवळीत आपल्या ठाम वैचारिक भूमिकांद्वारे तसेच अभ्यासपूर्ण लेखनातून महत्त्वपूर्ण योगदान देणारे विचारवंत डॉ. साळुंखे यांना यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ. साळुंखे यांनी आपल्या लेखनातून आणि सार्वजनिक भूमिकांमधून समता, विवेकवाद, विज्ञाननिष्ठा, संवैधानिक मूल्यांचा सातत्याने पुरस्कार केला आहे. सामाजिक विषमता, अंधश्रद्धा, जातीय अन्याय आणि शोषणाच्या व्यवस्थेवर त्यांनी केलेली चिकित्सक मांडणी समाजप्रबोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. डॉ. साळुंखे यांच्या दीर्घकालीन वैचारिक योगदानाची दखल घेऊन यंदाचा पुरस्कार त्यांना देण्याचा निर्णय निवड समितीने सर्वानुमते घेतल्याचेही डॉ. प्रधान यांनी सांगितले. पुरस्काराचे वितरण येत्या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची तारीख, तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande