
सोलापूर, 15 जानेवारी, (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत असताना, श्री सद्गुरू श्री शिवलाल स्वामी यांनी वयाच्या १०३ व्या वर्षी प्रभाग क्रमांक २३ मध्ये जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावून सर्वांसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला.
लोकशाहीप्रती असलेली निष्ठा आणि कर्तव्यभावना यांचे उत्तम उदाहरण स्वामींनी घालून दिले. मतदान केंद्रावर शांत, संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण उपस्थितीमुळे तेथे उपस्थित नागरिकांमध्ये विशेष उत्साह संचारला.या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य सुधीर बहिरवाडे आणि रवि तमायचे उपस्थित होते. दोघांनीही स्वामींना मतदान केंद्रापर्यंत साथ देत त्यांचा सन्मान आणि सेवा भाव व्यक्त केला.ज्येष्ठ नागरिकांनी मतदानात सहभागी व्हावे, असा प्रेरणादायी संदेश श्री शिवलाल स्वामी यांच्या या कृतीतून संपूर्ण समाजाला मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड