
परभणी, 15 जानेवारी (हिं.स.)।
या निवडणूकीत ज्येष्ठ नागरीकांसह अबालवृध्द व दिव्यांग नागरीकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. कुटूंबातील सदस्यांनी अपंग असणार्या किंवा अत्यंत वयोवृध्द असणार्या नागरीकांना काळजीपूर्वक मतदान केंद्रावर आणले. केंद्रांवरील व्हिलचेअरचा उपयोग घेतला. ज्या ठिकाणी व्हिलचेअर नाही, त्या ठिकाणी कुटूंबातील सदस्यांनी स्वतः या अबालवृध्दांना खांद्यावर घेवून मतदान केंद्र गाठले. या अबालवृध्दांच्या उत्साहाने केंद्राधिकारी व कर्मचारीसुध्दा अक्षरशः चकित झाले. ठिकठिकाणी कर्मचार्यांनी सुध्दा या मंडळींकरीता तात्काळ सुविधा उपलब्ध केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis