कंधारच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अब्दुल मन्नान
स्वीकृत सदस्यपदी म. हमीद सुलेमान, स्वप्निल लुंगारे नांदेड, 16 जानेवारी (हिं.स.)। कंधार नगरपरिषदची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष शहाजी नळगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत उपनगराध्यक्षपदी अब्दुल मन्नान म. सरवर यांची तर स्वीकृत सदस्य म्हणून क
कंधारच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अब्दुल मन्नान


स्वीकृत सदस्यपदी म. हमीद सुलेमान, स्वप्निल लुंगारे

नांदेड, 16 जानेवारी (हिं.स.)।

कंधार नगरपरिषदची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष शहाजी नळगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत उपनगराध्यक्षपदी अब्दुल मन्नान म. सरवर यांची तर स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसचे म. हमीद सुलेमान व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे हनुमंत ऊर्फ स्वप्निल लुंगारे यांची बिनविरोध नितट करण्यात आली

उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अब्दुल मन्नान म. सरवर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने नगराध्यक्ष नळगे यांनी त्यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर दोन स्वीकृत सदस्य म्हणून राष्ट्रवादी तर्फे हनुमंत ऊर्फ स्वप्निल लुंगारे तसेच काँग्रेस तर्फे म. हमीद सुलेमान यांची निवड झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी केली.

यानंतर सभेचे सचिव तथा मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी कंधार नगरपरिषदेचे सर्व नवनिर्वाचित व स्वीकृत सदस्यांचा अधिकृत पदभार कार्यान्वित झाल्याचेही जाटीर केले

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande