
नाशिक, 16 जानेवारी (हिं.स.) - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नियोजन, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मेहनत आणि उमेदवारांनी निवडून येण्यासाठी पॅनल टू पॅनल केलेल्या प्रचार यामुळे नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची एक हाती सत्ता आली आहे. त्यामुळे नाशिक शहराला या पंचवार्षिक मध्ये काय मिळते याकडे नासिकवासीयाचे लक्ष लागले आहे
भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता मिळाली आहे त्यामुळे भाजपचा पाच वर्ष महापौर राहणार हे आता निश्चित आहे हे सर्व घडत असताना महानगरपालिका निवडणुका आणि त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये तयार करण्यात आलेल्या निगेटिव्ह वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात पक्षासमोर अडचणी उभे राहतील असे वाटत होते त्या दृष्टिकोनातून पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील केदार तसेच सुनील देसाई नाना शिलेदार व इतर पदाधिकारी हे काम करत होते अनेक वेळा त्यांनी असे नकारात्मक वातावरण करणाऱ्यांना खडे बोल देखील सुनावले आणि ज्यावेळी पक्षाच्या सगळ्या घडामोडी लक्षात घेऊन स्वतः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे निवडणुकीच्या काही काळ आधीपासून मैदानात उतरले तसे बघितले तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुरुवातीपासूनच नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता स्थापन व्हावी यासाठी म्हणून भाजपच नियोजन केलेले होते आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेले त्यामुळे गिरीश महाजन यांनी केलेली खेळी ही यशस्वी झाली. या सर्व बाबी घडत असताना भाजपच्या विजयामध्ये उमेदवार स्थानिक पदाधिकारी तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अखेरच्या वेळेस घेतलेला गृहपाठ हा देखील कामी आला त्यामुळे उमेदवारांनी पॅनल टु पॅनल आपला प्रचार केला त्यामुळे भाजपाला हा जादुई आकडा पार करता आला. आणि त्यातूनच नासिक मधील विकासाची सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप पुढे निघून गेला.
उत्तर महाराष्ट्रात 100 टक्के भाजप - महाजन
नाशिककरांचे आभार 76 नगरसेवक निवडून आले आहेत 66 होते 76 झाले 10 वाढले. 10 तेव15 जागा हातच्या गेल्या. बहुमत मिळाले आहे. सर्वांचे आभार. जळगाव ला 46 पैकी 46 निवडून आले. तेथे स्पष्ट बहुमतात आहोत. नगर ला महायुती आहे. उत्तर महाराष्ट्र मध्ये 100 टक्के भाजप आहे. कुंभमेळा यशस्वी करायचा आहे. फडणवीस यांनी विकासावर बोलले. त्यामुळे मतदारांनी विश्वास ठेवला. बोलबच्चन सर्व हरवले आहेत. मीडिया समोर बडबड करण्यापेक्षा राज्यात फिरले असते तर 10 ते 15 जागा अजून आल्या असत्या. लोकांना वीट आला बदबडीचा आला होता. म्हणून लोकांनी त्यांचा बँड वाजवला आहे. २९ पैकी २६ ठिकाणी भाजपचा महापौर होणार आहे. याचे काम पावसाळ्यातल्या बेडकसारखे आहे. लोकांनी यांना स्पष्ट नाकारले आहे. फडणवीस यांचे मनापासून आभार त्यांनी खूप सभा घेतल्या. टीका करणारे डाव्या विचाराचे होते. तापोवणातील मुद्दा अकारण मोठा केला. अनेकांनी पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. लोकांचा विश्वास भाजप, फडणवीस आणि येथील नेत्यांवर आहे. 80 ते 90 पर्यंत निश्चित पोहोचलो असतो. निकाल समाधानकारक आहे. 107 तिकिट बरोबर दिले गेले शेवटच्या 10 ते 12 तिकिटांचा गोंधळ झाला. 75 टक्के तिकीट शिवसेनेने दिले ते आमचे पदाधिकारी आहेत. आयात केलेले सर्व निवडून आले आहेत. झालेले निर्णय योग्य झाले त्याचा फायदा झाला.
गिरीश महाजन
जलसंपदा मंत्री
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी