
जळगाव, 16 जानेवारी (हिं.स.) शिवसेनेच्या तिकीटावर माजी महापौर ललित कोल्हे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. कोल्हे कुटुंबीयांपैकी तिघांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. ललित कोल्हे, पियुष कोल्हे आणि सिंधू कोल्हे विजयी झाल्या आहेत. बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे कोठडीत आहे. दरम्यान, जळगाव कारागृहात पुरेशी जागा नसल्याच्या कारणावरून कोल्हे यांची थेट नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मनसे, भाजप आणि खान्देश विकास आघाडी अशा राजकीय प्रवासानंतर ललित कोल्हे शिंदेसेनेत स्थिरावले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यांनतर विरोधकांनी अनेक वल्गना केल्या.महायुतीला टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याची गरज असताना मात्र शिवसेना (उबाठा),राष्ट्रवादी (शप) व कॉंग्रेस स्वबळावर मैदानात उतरले त्यामुळे व्हायचा तो पररिणाम झाला.या तिघांना खाते देखील उघडता आले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर