शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दुग्धव्यवसाय महत्वाचा - आ.धस
बीड, 16 जानेवारी, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री. विवेक जॉन्सन (जिल्हाधिकारी, बीड) व जितीन रहमान
शेतकरीसमृद्धी #दुग्धव्यवसाय #पशुसंवर्धन #आष्टी #दूधउत्पादनवाढ #शेतकऱ्यांचेउत्पन्न #ग्रामीणअर्थव्यवस्था #मराठवाडादुग्धविकास #बीड


बीड, 16 जानेवारी, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री. विवेक जॉन्सन (जिल्हाधिकारी, बीड) व जितीन रहमान (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. बीड) यांची सदिच्छा भेट घेऊन बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी संबंधित असलेल्या दुग्ध व्यवसाय यावर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली.

महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा विभागात दुध व्यवसाय व पशुसंवर्धन हे शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, सध्या पशुसंवर्धन विभागाकडे उच्च प्रतीच्या व अधिक दूध उत्पादनक्षम गाई (कालवडी) जन्मास येण्यासाठी आवश्यक असणारे दर्जेदार बीज (सिमेंन) पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.

खाजगी बाजारात उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वळूचे सिमेंन अत्यंत गुणवत्तापूर्ण असले तरी त्याची किंमत जास्त असल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना ते परवडत नाही. या प्रजातीच्या वळूचे सिमेंन वापरल्यास शेतकऱ्यांच्या गोठ्यात अधिक दूध देणाऱ्या, तंदुरुस्त व दीर्घकाळ उत्पादनक्षम कालवडी/गाई जन्मास येऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार नवीन गाई खरेदी करण्याची गरज भासणार नाही आणि थेट आर्थिक लाभ होईल. त्यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे सिमेंन पशुसंवर्धन विभागामार्फत अल्प दरात उपलब्ध करून देण्याची आग्रहाची विनंती केली.

या पार्श्वभूमीवर, प्रती बीज ( सिमेंन) ५,०००रु. अनुदान देण्यात यावे व त्यासाठी जिल्हा नियोजन विभागामार्फत वार्षिक ₹२ कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी ठोस मागणी केली. या निर्णयामुळे उच्च दूध उत्पादनक्षम कालवडी तयार होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास व जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल याकरिता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मकता दर्शवत शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत करण्याचे सांगितले.

तसेच आष्टी तालुक्यातील दूध उत्पादनात अधिक वाढ व्हावी..यासाठी अत्याधुनिक, सर्व सेवा-सुविधायुक्त मुक्त गाय गोठा, व संपुर्ण ऑटोमेशन तंत्रप्रणाली अवलंबण्यासाठी कर्जपुरवठ्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे विभागीय व्यवस्थापक श्री. अमित धुळे यांच्याशीही चर्चा केली. यावेळी त्यांनी सकारात्मक भूमिका घेत योग्य ती आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिले.

मतदार संघातील शेतकऱ्यांच्या दुध व्यवसायाला बळ देणारा, उत्पन्नवाढीस चालना देणारा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणारा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न निश्चितच आशादायी ठरेल असा विश्वास आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande