सोलापूर महापालिकेत भाजपाचे वर्चस्व, काँग्रेसचा सुपडा साफ
सोलापूर, 16 जानेवारी (हिं.स.)। बहुचर्चित अशा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या निकाल आणि कल यानुसार पुन्हा एकदा भाजप दणदणीत बहुमताकडे वाटचाल करू लागल्याचे चित्र आहे. दुसऱ्या स्थाना
smc


सोलापूर, 16 जानेवारी (हिं.स.)।

बहुचर्चित अशा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या निकाल आणि कल यानुसार पुन्हा एकदा भाजप दणदणीत बहुमताकडे वाटचाल करू लागल्याचे चित्र आहे. दुसऱ्या स्थानावर एमआयएम असून, शिवसेना शिंदे गट व अजित पवारांच्या युतीला म्हणावा तसा करिष्मा करता आलेला नाही. काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे आत्तापर्यंतच्या निकालवरून दिसत आहे. माकप, एमआयएम, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेनेचीही तिच गत झाल्याचे सध्यातरी चित्र आहे.

102 जागांसाठी अटीतटीची लढत झाली. सर्वच्या सर्व म्हणजे 102 जागांवर एकट्या भाजपनेच उमेदवार दिले. अन्य पक्षांना सर्व ठिकाणी उमेदवार देखील मिळाले नसल्याचे वास्तव आहे.

तब्बल आठ वर्षांनतर झालेली ही निवडणूक एका खुनामुळे राज्यभर गाजली. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. देवेंद्र कोठे विरूद्ध शिवसेनेचे नेते अमोल शिंदे यांच्यातील वादाची ठिणगी खालच्या पातळीवरील टिकेपर्यंत गेल्यामुळे या निवडणुकीला गालबोट लागले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande