
नांदेड, 16 जानेवारी (हिं.स.)।
मुखेड परिसराला बेमोसमी पावसाने झोडपून काढले. बेमोसमी पावसाने शहर व परिसराला झोडपले. आधीच थंडी आणि त्यात पावसामुळे वातावरणात गारवा यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांची त्रेधातिरपीट उडाली.
रब्बी हंगामातील पिकांची मशागत सुरु असताना ढगाळ वातावरण व बेमोसमी पावसाच्या दणक्याने हरभरा, गहू, ज्वारी, सूर्यफूल, भुईमूग, शेंगा पिकांना मोठा फटका बसला आहे. हरभरा तंबोरा नावाचा रोग दिसून येत आहे. धुक्यामुळे गहू, ज्वारी पिकावर रोग पडला आहे. आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. चिंचसह पपई, मोसंबी, डाळींब, मोसंबी, चिकू फळबागांना फटका बसला आहे.
गत काही दिवसापासून ढगाळ वातावरणात हाडे गोठविणारी थंडी आणि दाट धुक्यामुळे सर्दी पडसे, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी या आजाराने घराघरात रुग्ण वाढले आहेत. वयोवृध्द नागरिक बेजार झाले आहेत. त्यातच थंडीने जुनाट आजार संधीवात, खोकलाने डोकेवर काढले आहे. घरोघरी शेकडो रुग्ण सर्दी, पडसे, खोकला, तापाने बेजार झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis