
परभणी, 17 जानेवारी, (हिं.स.)। पाथरी तालुक्यातील लिंबा सर्कल येथे शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश व नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन नाना टाकळकर यांनी नियोजनबद्ध केले होते.
यावेळी बोलताना खान म्हणाले की, पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे सशक्त नेतृत्व, सर्वसमावेशक भूमिका आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे विकासाभिमुख निर्णय यांवर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेची वाट निवडली आहे. हा निर्णय निश्चितच प्रेरणादायी असून त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या पक्षविस्ताराला नवी दिशा व नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास आहे.सर्व नवनवीन सहकाऱ्यांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis