
अकोला, 17 जानेवारी, (हिं.स.)। मराठा पाटील संघाच्या वतीने १७ ते २६ जानेवारी २०२६ या काळात समाज संवाद पदयात्रा काढली जाणार आहे ही पदयात्रा काजीरखेड ते वाडेगाव या मार्गावर होणार आहे. या पदयात्रेचा उद्देश मराठा पाटील समाजातील प्रश्न समजून घेणे आणि लोकांशी थेट संवाद साधणे हा आहे समाजातील परंपरा संस्कार बदलत चालले आहेत वाढता खर्च मुलामुलींच्या लग्नाच्या अडचणी बेरोजगारी शेती आणि शिक्षणाचे प्रश्न यावर या पदयात्रेत चर्चा केली जाणार आहे.
१७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता काजीरखेड येथून पदयात्रेची सुरुवात होईल आणि २६ जानेवारी रोजी वाडेगाव येथे समारोप होईल दररोज सकाळी ८ ३० वाजता पदयात्रा सुरू होईल आणि संध्याकाळी ५ वाजता मुक्कामी पोहोचेल.
या दरम्यान पदयात्रा विविध गावांतून मार्गक्रमण करणार असून प्रत्येक गावात ग्रामप्रदक्षिणा काढून लोकांशी संवाद साधला जाणार आहे गावातील प्रश्न ऐकून घेण्यात येणार आहेत. तसेच गुणवंत विद्यार्थी खेळाडू आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे
मराठा पाटील संघाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे, हार शाल पुष्पगुच्छ न देता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपल्या गावातील अडचणी मोकळेपणाने मांडाव्यात. ही पदयात्रा समाजाला एकत्र आणणारी आणि बदल घडवणारी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे