रत्नागिरी : सप्रे स्मृती फिडे मानांकन बुद्धिबळ राज्य निवड स्पर्धेत आदित्य, गणेश, साहिल आघाडीवर
रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : येथे सुरू असलेल्या सप्रे स्मृती फिडे मानांकन राज्य निवड एच 2 ई पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी चार फेऱ्यांनंतर पुण्याचा साहिल शेजळ, नाशिकचा गणेश ताजणे आणि सांगलीचा आदि
गणेश ताजणे


आदित्य चव्हाण


साहिल ताजणे


रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : येथे सुरू असलेल्या सप्रे स्मृती फिडे मानांकन राज्य निवड एच 2 ई पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी चार फेऱ्यांनंतर पुण्याचा साहिल शेजळ, नाशिकचा गणेश ताजणे आणि सांगलीचा आदित्य चव्हाण यांनी आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करत एकूण चारपैकी चार गुण मिळवून आघाडी मिळवली.

चौथ्या फेरीत अग्रमानांकित इंद्रजित महिंद्रकरला मुंबई उपनगरच्या सागर शेणॉयने बरोबरीत रोखले. चौथ्या फेरीत नाशिकच्या गणेश ताजणे याने नागपूरच्या शुभम लाकुद्कारचा पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली.

राज्यभरातील २३ जिल्ह्यांतील एकूण १४४ खेळाडू सहभागी झालेल्या या रत्नागिरीतील पहिल्या वहिल्या फिडे मानांकन क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत रात्नागिरीतील बुद्धिबळपटूदेखील उत्तम कामगिरी बजावत असून सौरीश कशेळकर साडेतीन गुणांसह गुणतालिकेत रत्नागिरीतील अव्वल खेळाडू ठरला आहे. नवोदित बुद्धिबळपटू मानस सिधये, आयुष रायकर, अलिक गांगुली, आरव निमकर, आर्यन धुळप, कौस्तुभ हर्डीकर, सोहम कुरवार, हर्ष चव्हाण आणि लवेश पावसकर यांनी उत्तम कामगिरी करीत फिडे मानांकन मिळण्याच्या आशा प्रज्वलित केल्या आहेत.

रविवारी, दि. १८ जानेवारी रोजी स्पर्धेची सांगता होणार असून अजून एकूण चर फेऱ्या शिल्लक आहेत. स्पर्धेत मुख्य पंच भरत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली प्राची मयेकर, पौर्णिमा उपळावीकर-माने, मनीष मारूळकर व शशिकांत मक्तेदार काम पाहत असून सर्व तांत्रिक जबाबदारी विवेक सोहनी व चैतन्य भिडे पार पाडत आहेत.

ही स्पर्धा मराठा भवन मंगल कार्यालयात होत असून सर्व बुद्धिबळप्रेमींनी स्पर्धेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि केजीएन सरस्वती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande