
मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.) - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेले स्टार प्रचारक खालील प्रमाणे :
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, खासदार सुनेत्रा पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, माजी मंत्री धनंजय मुंडे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार नितीन पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री नवाब मलिक, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, आमदार शेखर निकम, आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार अनिकेत तटकरे, आमदार सना मलिक-शेख, आमदार सतीश चव्हाण, आमदार राजेश विटेकर, आमदार विक्रम काळे,माजी आमदार झिशान सिद्दीकी, आमदार इद्रीस नायकवडी,अल्पसंख्याक नेते हाजी ईस्माईल शेख, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, प्रदेश प्रवक्ते प्रतिभा शिंदे, अल्पसंख्याक नेते आणि ठाणे नगरसेवक नजीब मुल्ला, विकास पासलकर आदींचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी