
लातूर, 17 जानेवारी, (हिं.स.) शांत, सुरक्षित आणि सुसंस्कृत लातूर कधीही असंस्कृत राजकारण स्वीकारत नाही, हे येथील जनतेने महापालिका निवडणुकीच्या निकालातून दाखवून दिले आहे, अशा शब्दांत माजी मंत्री व आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरकरांचे जाहीर आभार मानले. भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर देत लातूरकरांनी विकासाला साथ दिल्याचे त्यांनी नमूद केले.
ठळक वैशिष्ट्ये :
विक्रमी विजय : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने ७० पैकी ४७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले.
नेत्यांना अभिवादन : विजयानंतर सर्व नवनिर्वाचित उमेदवारांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून जल्लोष केला.
वारशाची ताकद : विलासरावजी देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या विचारांवर लातूरकरांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.
फोडाफोडीचे राजकारण फेल: भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने केलेली मतविभाजनाची रणनीती लातूरच्या मतदारांनी हाणून पाडली.
कार्यकर्त्यांचे मानले आभार
काँग्रेस भवन येथे आयोजित विजयी मेळाव्यात बोलताना अमित देशमुख म्हणाले की, अनेक इच्छुकांनी उमेदवारी न मिळूनही बंडखोरी केली नाही, उलट पक्षासाठी अहोरात्र कष्ट घेतले. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्ष येणाऱ्या काळात योग्य संधी नक्कीच देईल.
खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार धीरज देशमुख, जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, शहराध्यक्ष ॲड. किरण जाधव, सौ. अदिती देशमुख आणि हजारो कार्यकर्ते.आदी मान्यवरांची उपस्थिती होती .
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis