घातक परिणामांपासून वाचण्यासाठी भौतिक सुखसुविधांचा योग्य वापर करणे गरजेचे - प्रा. डॉ. घोडके
बीड, 17 जानेवारी, (हिं.स.)। प्रमिलादेवी पाटील कला विज्ञान महाविद्यालय, नेकनूर येथे भूगोल विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल दिन साजरा करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. घोडके (जे. व्हि. कला महाविद्यालय
घातक परिणामांपासून वाचण्यासाठी भौतिक सुखसुविधांचा योग्य वापर करणे गरजेचे - प्रा. डॉ. घोडके


बीड, 17 जानेवारी, (हिं.स.)। प्रमिलादेवी पाटील कला विज्ञान महाविद्यालय, नेकनूर येथे भूगोल विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल दिन साजरा करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. घोडके (जे. व्हि. कला महाविद्यालय, नांदूर घाट) आणि प्रा. म्हस्के उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ढास विजय डि. के. होते.

प्रमुख पाहुणे डॉ. घोडके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भूगोल दिन साजरा केल्यामुळे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, भूकंप, जमीन, हवा, हवामान यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळते. सजीव सृष्टीवर होणाऱ्या घातक परिणामांपासून वाचण्यासाठी भौतिक सुखसुविधांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. पृथ्वी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे.

समारोप करताना प्राचार्य डॉ. ढास यांनी सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रदूषण रोखणे आवश्यक आहे. भविष्यात शुद्ध हवा मिळावी यासाठी भूसृष्टीवरील प्रदूषण नियंत्रित करणे गरजेचे आहे. भावी पिढीला ऑक्सिजन, पृथ्वीचा ऱ्हास, तापमानवाढ याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. भूगोलाच्या अभ्यासामुळे संरचना, राहणीमान, जमिनीचे प्रकार, नदी, सरोवर यांची माहिती मिळते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुजावर एस. टी. यांनी केले. आभार प्रा. विक्रम इनकर (रा. से. यो. विभागप्रमुख) यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande