
मुंबई, 17 जानेवारी, (हिं.स.)। कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी आज शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिंदे यांनी पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने, शिरोली दुमला गावचे सरपंच सचिन पाटील, हनुमान दूध संघ, महे चे अध्यक्ष बुद्धिराज शंकर पाटील महेकर, यशवंत सहकारी बँक कुडित्रेचे संचालक नंदकुमार अण्णासाहेब पाटील, अनिल सोलापूरे, राहुल पाटील, एस. के. पाटील, माधव पाटील, सुनील पाटील आणि असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते विश्वासराव पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने पक्ष कोल्हापुरात अधिक मजबूत झाला असून, त्यांचा सहकार आणि पक्षकार्याचा अनुभव शिवसेनेसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके हेदेखील उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर