अकोला - तरुणावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी काही तासांतच गजाआड
अकोला, 20 जानेवारी (हिं.स.)। अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोठी उमरी परिसरात काल एका युवकावर भरदुपारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.. या प्रकरणातील आरोपींना अखेर पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.जुन्या वादातून तरुण
Photo


Photo


अकोला, 20 जानेवारी (हिं.स.)।

अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोठी उमरी परिसरात काल एका युवकावर भरदुपारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.. या प्रकरणातील आरोपींना अखेर पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.जुन्या वादातून तरुणावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील उमरी परिसरात युवक नामे ओम मोहन राऊत, वय २० वर्षे, रा मोठी उमरी, अकोला हा त्याचे मित्रासह दुचाकीने कृषी विद्यापीठ येथील शिवमंदिरात दर्शनासाठी जात असतांना रौनक मंगल कार्यालया समोर आरोपी नामे अंकुश पिंपळकर, रोशन होपळ, गौरव काळे, अनूप वाहूरवाध सर्व रा. लहान उसरी अकोला यांनी ओम राऊत याची गाडी अडवून एका वर्षापुर्वी झालेल्या जुन्या मारहाणी वरून राग मनात थरून संगणमत करत ओमची कॉलर पकडून शिवीगाळ केली. आणि त्याला जीवाने मारण्याचे उद्देशाने अंकुश पिंपळकर याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड. ओमचे डोक्यावर मारला व गौरव काळे याने ओमन्या पाठीमागून दोनवेळा चाकूने वार केले व ईतरांनी त्याला लाथा बुक्यांनी मारहान करून त्याला गंभीर जख्मी केले अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पो. स्टे. सिव्हील लाईन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक यांनी पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्था.गु.शा. अकोला महिला पो. नि. मालती कायटे पो.स्टे. सिव्हील लाईन यांना आरोपी याचा शोध घेउन तात्काळ अटक करणे कामी पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. अकोला व पोलीस निरीक्षक सिव्हील लाईन अकोला यांनी वेगवेगळे पथक तयार करून सदर पथकाने तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून स्था.गु.शा. अकोला या पथकाने आरोपी नामे १. गौरव सहदेव काळे वय २२ वर्षे राहणार लहान उमरी २. अनुप दिनेश वाहूरवाध वय २१ वर्षे राहणार लहान उमरी व पोलिस स्टेशन सिव्हिल लाइन येथील पथकाने ३. अंकुश अनिल पिंपळकर वय २१ वर्षे राहणार लहान उमरी ४. रोशन रामदासं होपळ वय २३ वर्षे राहणार लहान उमरी या गुन्हयातील आरोपीना अटक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande