नाशिक - गोदा आरतीतून मतदार जनजागृतीचा जागर
रामकुंड येथे हजारो भाविकांनी मतदानाची घेतली प्रतिज्ञा नाशिक, 2 जानेवारी (हिं.स.)। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृती अभियानांतर्गत गोदावरी नदीकिनारी रामकुंड येथे सायंकाळी आयोजित गोदा आरतीच्या निमित्ताने उपस्थित हजा
गोदा आरतीतून मतदार जनजागृतीचा


रामकुंड येथे हजारो भाविकांनी मतदानाची घेतली प्रतिज्ञा

नाशिक, 2 जानेवारी (हिं.स.)। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृती अभियानांतर्गत गोदावरी नदीकिनारी रामकुंड येथे सायंकाळी आयोजित गोदा आरतीच्या निमित्ताने उपस्थित हजारो भाविकांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली.

मतदानाची टक्के वारी वाढविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमात गोदा आरतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नाशिक महानगर-पालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदार जनजागृती प्रतिज्ञा देण्यात आली.

यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च सुरू करून मतदार जनजागृती अभियानाला प्रतीकात्मक पाठिंबा दर्शविला. तसेच रामकुंड परिसरात नाशिक महापालिकेचे बोधचिन्ह, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह व मतदार जनजागृती अभियानाचे बोधचिन्ह रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात येऊन नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.

या प्रतिज्ञेचे वाचन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले व गोदा आरतीत सहभाग घेतला. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित नाशिककरांना प्रत्येक नागरिकाने मतदान करण्याचे आवाहन केले. मतदानाचे महत्त्व अधोरेखित करताना लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी महानगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येणारे प्रभावी व नाविन्यपूर्ण उपक्रम मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यास निश्चितच बळकटी देतील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला.

वोट कर नाशिककर

कर मतदान, सांगतंय संविधान, मतदान सर्वश्रेष्ठ दान अशा घोषणांनी संपूर्ण रामकुंड परिसर दुमदुमून गेला. यावेळी गोदावरी नदीत दिवे प्रज्वलित करून 'एक दिवा मतदानासाठी' हे विशेष अभियानही राबविण्यात आले. या कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर, उप आयुक्त संगीता नांदुरकर, शिक्षण अधिकारी डॉ. मीता चौधरी यांनी मतदार प्रतिज्ञा घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande