नांदेड शहरात 7 जानेवारीपासून जड वाहनांना प्रवेशबंदी
नांदेड, 02 जानेवारी (हिं.स.)। जड वाहनामुळे नांदेड शहरात वाहतुक कोंडी, अपघात अशा समस्‍या उद्भवत आहेत. या अनुषंगाने नांदेड शहरात 7 जानेवारीपासून जड वाहनांना सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहणार आहे. याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍याव
नांदेड शहरात 7 जानेवारीपासून जड वाहनांना प्रवेशबंदी


नांदेड, 02 जानेवारी (हिं.स.)।

जड वाहनामुळे नांदेड शहरात वाहतुक कोंडी, अपघात अशा समस्‍या उद्भवत आहेत. या अनुषंगाने नांदेड शहरात 7 जानेवारीपासून जड वाहनांना सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहणार आहे. याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

याबाबत अधिसुचना निर्गमीत करण्‍यात आली असून या अधिसुचनेचा अंमल 7 जानेवारी 2026 पासुन सुरु होईल. जड वाहनामुळे शहरातील वाहतुक कोंडी व जडवाहन अपघाताने होणारी जिवीत हानी या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयास विविध संघटना, जनतेकडून निवेदने प्राप्‍त झाली आहेत. 16 डिसेंबर रोजी बैठकीत यासंबंधाने जिल्‍हादंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी समवेत पोलीस अधिक्षक, मार्ग परीवहन अधिकारी नांदेड यांच्यात झालेल्‍या चर्चेनुसार या समस्‍येवर उपाययोजना करण्‍यासाठी जड वाहनांना नांदेड शहरात सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्‍याचे निश्‍चीत झाले आहे. याची सर्व संबंधित जडवाहनधारकांनी नोंद घ्यावी असेही आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande