
मुंबई, 02 जानेवारी (हिं.स.) - महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी - शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी, ३ जानेवारीपासून होत आहे. उद्या सायंकाळी ६ वाजता वरळीतील एनएससीआय डोममध्ये या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख वक्ते असणार आहेत. मुंबईतील सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते यावेळी सहभागी होणार आहेत. सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती यावेळी दिली जाईल.
मुंबईच्या विकासाचे भाजपा-शिंदेसेनेचे व्हिजन दोन्ही नेते या मेळाव्यात मांडणार आहेत. भाषणामध्ये ते ठाकरे बंधू आणि काँग्रेसला प्रामुख्याने लक्ष्य करण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेवरील ठाकरेंचे वर्चस्व संपुष्टात आणण्याचा संकल्प या मेळाव्याद्वारे करण्यात येणार आहे. भाजपा, शिंदेसेनेचे मुंबईतील सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती यावेळी दिली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी