दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळामार्फत 'पोटरा' चित्रपटाचे प्रदर्शन
मुंबई, 20 जानेवारी, (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी छाप उमटविणारा ''पोटरा'' या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. महाराष्ट्र चित्
मुंबई


मुंबई, 20 जानेवारी, (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी छाप उमटविणारा 'पोटरा' या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुरू केलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळामार्फत पोटरा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

१ तास १८ मिनिटांच्या 'पोटरा' चित्रपटात ग्रामीण वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. ग्रामीण भागात आजही मुलींना समाजातील जुनाट रूढी-परंपरांमुळे कशा प्रकारचे बंधनकारक आयुष्य जगावे लागते, याचे अत्यंत संवेदनशील आणि वास्तववादी चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.

चित्रपट प्रदर्शनावेळी सभासदासह प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande