नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था आता संपुष्टात आली आहे, कॅनडाचा अमेरिकेला कडक संदेश
बर्न, 21 जानेवारी (हिं.स.)।ग्रीनलँडवर अमेरिकेच्या ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दावोस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट आणि कठोर संदेश दिला. त्यांनी थेट नाव न घेता अमेरिके
नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था आता संपुष्टात आली आहे, कॅनडाचा अमेरिकेला कडक संदेश


बर्न, 21 जानेवारी (हिं.स.)।ग्रीनलँडवर अमेरिकेच्या ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दावोस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट आणि कठोर संदेश दिला. त्यांनी थेट नाव न घेता अमेरिकेवर आणि ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करत म्हटले की, “नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था आता संपुष्टात आली आहे.”

अहवालानुसार, पंतप्रधान कार्नी म्हणाले की आजचे जग असे झाले आहे जिथे शक्तिशाली देश आपल्या हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी आर्थिक एकत्रीकरणाला शस्त्रासारखे वापरत आहेत. दावोस येथील आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की मध्यम सामर्थ्य असलेल्या देशांनी आक्रमक महासत्तांच्या दबावाला तोंड देण्यासाठी एकत्र येणे अत्यावश्यक आहे.अलीकडील घडामोडींमुळे हे स्पष्ट झाले आहे की “नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था” प्रभावीपणे समाप्त झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत कार्नी म्हणाले की कॅनडा आणि इतर देशांकडे आता नवे आघाडी व गठबंधने उभारण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. महासत्तांच्या दबाव आणि धमक्यांच्या रणनीतींना प्रत्युत्तर देण्यासाठी हे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव थेट घेतले नाही.

ट्रम्प यांनी वारंवार सुरक्षा कारणांचे कारण देत ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचे दावे केल्यामुळे आर्क्टिक प्रदेशात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक मंचात बोलताना पंतप्रधान कार्नी यांनी सांगितले की कॅनडा ग्रीनलँडच्या बाजूने ठामपणे उभा आहे. ते म्हणाले की हा अर्धस्वायत्त बेट आणि डेन्मार्क यांनाच “ग्रीनलँडच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा अनन्यसाधारण अधिकार” आहे.

ट्रम्प यांच्याकडे अप्रत्यक्ष इशारा करत कार्नी म्हणाले, “‘नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था’ असा उल्लेख करणे थांबवा, जणू ती अजूनही जाहिरात केल्याप्रमाणे कार्यरत आहे. व्यवस्थेला तिच्या खऱ्या स्वरूपात ओळखा. हा असा काळ आहे जिथे सर्वात शक्तिशाली देश आपल्या हितासाठी आर्थिक एकत्रीकरणाला जबरदस्तीचे शस्त्र बनवत आहेत.”

कार्नी यांनी पुढे सांगितले की कॅनडा नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) मधील भागीदारांसोबत आघाडीच्या उत्तर आणि पश्चिम भागांचे संरक्षण मजबूत करण्यासाठी काम करत आहे. नाटोच्या संयुक्त संरक्षण तत्त्वांप्रती आणि अनुच्छेद 5 प्रति कॅनडाची बांधिलकी अढळ असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ट्रान्स-अटलांटिक संबंधांमध्ये वाढत चाललेल्या दरीच्या पार्श्वभूमीवर हे भाषण झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande