बजाज पुणे ग्रँड टूर 2026 : ‘मुळशी–मावळ माईल्स’ टप्प्यात ल्यूक मडग्वेचा विजय
पुणे, 21 जानेवारी (हिं.स.)। बजाज पुणे ग््राँड टूर 2026‌’ या सायकलिंग स्पर्धेच्या पहिला टप्पात अर्थात ‌‘मुळशी-मावळ माईल्स‌’मध्ये चीनच्या ‌‘ली निंग स्टार‌’ संघाचा ल्यूक मडग्वे (न्यूझीलंडचा रायडर) विजेता ठरला. त्याने 2 तास 00.21 सेकंदांत 87.2 किलोमीटर
Grand


पुणे, 21 जानेवारी (हिं.स.)। बजाज पुणे ग््राँड टूर 2026‌’ या सायकलिंग स्पर्धेच्या पहिला टप्पात अर्थात ‌‘मुळशी-मावळ माईल्स‌’मध्ये चीनच्या ‌‘ली निंग स्टार‌’ संघाचा ल्यूक मडग्वे (न्यूझीलंडचा रायडर) विजेता ठरला. त्याने 2 तास 00.21 सेकंदांत 87.2 किलोमीटरचे अंतर पार करून बाजी मारली.

या स्पर्धेत 87.2 किलोमीटरच्या या आव्हानात्मक मार्गावर गवताळ प्रदेश, वळणदार डोंगराळ रस्ते आणि धरणाचे विलोभनीय बॅकवॉटर अशा निसर्गरम्य; पण खडतर प्रवासातून सायकलपटूंनी आपला मार्ग काढला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या पहिल्या टप्प्यात ल्यूकला विजयासाठी मोठी झुंज द्यावी लागली.

एस्टोनियाच्या ‌‘क्विक प्रो‌’ संघाचा अँड्रियास मटिल्डास (02 तास 00:27 सेकंद) दुसऱ्या स्थानी, तर बेल्जियमच्या ‌‘टार्टलेटो-आयसोरेक्स‌’ संघाचा योर्बेन लॉरिसेन (02 तास 00:30 सेकंद) तिसऱ्या स्थानी राहिला. ‌‘युनियन सायकलिंग इंटरनॅशनल‌’च्या नियमांनुसार, पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 10, 6 आणि 4 सेकंदांचा ‌‘टाइम बोनस‌’ देण्यात आला. जो पुढील टप्प्यांमध्ये निर्णायक ठरू शकतो.

विजयानंतर बोलताना ल्यूक म्हणाला, ‌‘सुरुवातीपासूनच शर्यत खूप वेगवान होती. पहिल्या चढणानंतर मुख्य जथ्था विभागला गेला. माझ्या दोन सहकाऱ्यांनी मला खूप मदत केली आणि संघासाठी हा विजय मिळवून देताना मला खूप आनंद होत आहे.‌’ तांत्रिकदृष्ट्या अवघड असलेल्या वळणदार उतारावर मिळालेल्या आघाडीमुळे विजय सुकर झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande