१९ वर्षांखालील विश्वचषक : ऑस्ट्रेलियाच्या विल मालास्झ्झुकने झळकावले सर्वात जलद शतक
विंडहोक, 21 जानेवारी (हिं.स.)१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक २०२६ च्या गट अ सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या युवा फलंदाजाने जपानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यावर एक रोमांचक आणि ऐतिहासिक क्षण घडला. डावखुरा सलामीवीर विल मालास्झ्झुकने आपल्या स्फोटक फलंदाजीने वि
विल मालास्झ्झुक


विंडहोक, 21 जानेवारी (हिं.स.)१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक २०२६ च्या गट अ सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या युवा फलंदाजाने जपानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यावर एक रोमांचक आणि ऐतिहासिक क्षण घडला. डावखुरा सलामीवीर विल मालास्झ्झुकने आपल्या स्फोटक फलंदाजीने विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. जपानने दिलेल्या २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, तरुण मालास्झ्झुकने केवळ ५१ चेंडूत शतक ठोकून ही कामगिरी केली आणि आयसीसी पुरुषांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात सर्वात जलद शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला.

त्याने ५५ चेंडूंच्या त्याच्या डावात एकूण १०२ धावा केल्या. त्याच्या खेळीत १२ शानदार चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट १८५.४५ होता, ज्यामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाची सामन्यावरील पकड मजबूत झाली.

मलाजचुकने सहकारी सलामीवीर नितेश सॅम्युअलसह जपानी गोलंदाजीचा हल्ला पूर्णपणे उध्वस्त केला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी फक्त १५.३ षटकांत १३५ धावांची स्फोटक भागीदारी केली. पण आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना मलाजचुक बाद झाला. पण तोपर्यंत त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते. नितेश सॅम्युअल ६० धावांवर नाबाद राहिला आणि ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून सामना सहज जिंकला.

तत्पूर्वी, ह्युगो केलीच्या नाबाद ७९ धावांच्या झुंजीमुळे जपानने ८ बाद २०१ धावा केल्या होत्या. नदीन कुरे ऑस्ट्रेलियाकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ३१ धावांत ३ बळी घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande