
जकार्ता, 21 जानेवारी (हिं.स.)दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि माजी जागतिक नंबर वन किदाम्बी श्रीकांत यांनी आपापले सामने जिंकून इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पाचव्या मानांकित सिंधूने जपानच्या मनामी सुईझूचा ५३ मिनिटांत २२-२०, २१-१८ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत ३३ व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतने एक तास १२ मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक नंबर २२ कोकी वतानाबेचा २१-१५, २१-२३, २४-२२ असा पराभव केला.
आता श्रीकांतचा सामना आता चौथ्या मानांकित चायनीज तैपेईच्या चाऊ तिएन चेनशी होणार आहे. त्याने आयर्लंडच्या न्गुयेनचा २१-१४, २१-१५ असा पराभव केला. किरण जॉर्जला पहिल्या फेरीत इंडोनेशियन झाकी उबैदिल्लाहकडून १७-२१, १४-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.
महिला एकेरीत आकर्शी कश्यपलाही पहिल्या फेरीत ज्युली दावल जेकोबसेनकडून २१-८, २०-२२, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. रोहन कपूर आणि रुत्विका गड्डे, ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांच्यासह भारताचे मिश्र दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.
कपूर आणि गड्डे यांना चौथ्या मानांकित फ्रेंच जोडी थॉम गिकुल आणि डेल्फिन डेलरू यांनी २१-९, २२-२० असा पराभव पत्करावा लागला, तर कपिला आणि क्रॅस्टो यांना फ्रेंच जोडीदार ज्युलियन मायो आणि ली पालेर्मो यांच्याकडून २१-२३, २२-२०, २१-६ असा पराभव पत्करावा लागला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे