
परभणी, 26 जानेवारी (हिं.स.)।
पाथरी येथील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अन्वर शेख शमशुद्दीन यांची परभणी जिल्हा काँग्रेसच्या सल्लागार तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी २६ जानेवारी रोजी त्यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र दिले.
अन्वर शेख यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव व पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसची विचारधारा व पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे परभणी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीस चालना मिळेल, असा विश्वास आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल अन्वर शेख यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis