“वंदे मातरम” गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शनिवारवाडा येथे लष्कराच्या वाद्यवृंदाचे सादरीकरण
पुणे, 26 जानेवारी (हिं.स.) - पुणे शहराच्या वारशाच्या केंद्रस्थानी देशभक्तीची पताका फडकावत पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात लष्कराच्या वाद्यवृंदाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “वंदे मातरम”या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्
Vande Mataram Shaniwarwada


पुणे, 26 जानेवारी (हिं.स.) -

पुणे शहराच्या वारशाच्या केंद्रस्थानी देशभक्तीची पताका फडकावत पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात लष्कराच्या वाद्यवृंदाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “वंदे मातरम”या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आर्मर्ड कॉर्प्स आणि स्कूल लष्करी वाद्यवृंदाने बॉम्बे इंजिनियर ग्रुप आणि केंद्राच्या (बीईजी सेंटर) पाईप बँड तसेच जॅझ बँडसह एकत्र येत सादर केलेल्या कार्यक्रमामुळे हा ऐतिहासिक किल्ला अभिमानाने दुमदुमून गेला. खडकी येथील बीईजी केंद्रातील दक्षिणी कमांडच्या मुख्यालयाच्या अधिपत्याखाली सादर करण्यात आलेला हा कार्यक्रम सामान्य जनतेसाठी खुला होता.

या कार्यक्रमाने देशाच्या स्वातंत्र्यचळवळीला प्रेरणा देणाऱ्या तसेच देशाची एकता आणि राष्ट्रीय ओळख यांचे आजही प्रतीक ठरणाऱ्या “वंदे मातरम्” या गीताचा सन्मान केला. शनिवारवाड्याच्या सुप्रतिष्ठित वास्तूच्या पार्श्वभूमीवर आयोजित झालेल्या या कार्यक्रमाने मनाला भिडणाऱ्या धून आणि काळाचा सन्मान करणारी समर गीते यांच्या माध्यमातून प्रजासत्ताकाच्या चिरस्थायी भावनेचा उत्सव साजरा केला. अचूकता, शिस्त आणि सांगितिक उत्कृष्टतेसाठी प्रसिध्द असलेल्या या सामुहिक वाद्यवृदांनी उपस्थित नागरिक तसेच पर्यटक अशा दोन्ही वर्गांसाठी दृश्य आणि भावनिकदृष्ट्या अधिक उंचीवर घेऊन जाणारा अनुभव देत, देशभक्तीपर रचना आणि लष्कराची उत्सवी धून यांचा मिलाफ असलेला कार्यक्रम सादर केला.

दिनांक 10 एप्रिल 1948 मध्ये स्थापन करण्यात आलेला आर्मर्ड कॉर्प्स आणि स्कूल लष्करी वाद्यवृंद प्रजासत्ताक दिन, सेना दिवस, राष्ट्रपती भवनाशी संबंधित कर्तव्ये, अमर जवान ज्योती, ओळखपत्रे/मार्गदर्शन सादरीकरणे यांसह राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विविध प्रमुख प्रसंगी सादरीकरणाचा विशिष्ट विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या बँडने आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडन (1990), भूतान (2003), स्वीडन (2006) आणि एडिनबर्ग (2008) इत्यादी ठिकाणी देखील भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या कार्यक्रमात भारताची प्रेरणा आणि त्याग यांना आदरांजली वाहत, “वंदे मातरम्” गीतावरून प्रेरित अनेक आकर्षक रचनांसह, विविध देशभक्तीपर सुरांच्या ओळी आणि राष्ट्रीय गाणी सादर करण्यात आली.

देशभरात “वंदे मातरम्” गीताची दीडशे वर्षे तसेच हे गीत ज्या ऐक्य, त्याग आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिनिधित्व करते त्या कालातीत आदर्शांना साजरे करण्यात येत असताना, भारतीय सैन्याचे देशाच्या वारशाशी असलेले गहन नाते आणि देशभक्तीपर परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्यात सैन्याची असलेली भूमिका अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग बघायला मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande