150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल
* 200 पैकी 198.75 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मुंबई, 26 जानेवारी (हिं.स.) : राज्याच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील एकूण 97 शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल


* 200 पैकी 198.75 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी

मुंबई, 26 जानेवारी (हिं.स.)

: राज्याच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील एकूण 97 शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामान्यीकृत 200 गुणांपैकी 198.75 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला “150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम” राज्यातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरत आहे.

या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सर्व प्रवर्गांमध्ये (Generalised Categories) महाराष्ट्र सागरी मंडळाने ही सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून कागदविरहित प्रशासन, वेळबद्ध सेवा, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे हे यश मिळाले आहे.

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ व विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande