बेंगळुरूमध्ये रथयात्रेवर दगडफेक; पोलिसांकडून गुन्हा दाखल
बंगळूर, 05 जानेवारी (हिं.स.)। बेंगळुरूच्या जगजीवन राम नगर परिसरात ओम शक्ती मंदिराची शोभायात्रा सुरू असताना रथ ओढणाऱ्या भाविकांवर दगडफेक झाल्याची घटना घडली. रविवारी रात्री घडलेल्या या प्रकारात दगडफेकीत एका मुलीला (किंवा काही वृत्तांनुसार महिला) दुखा
Bengaluru


बंगळूर, 05 जानेवारी (हिं.स.)। बेंगळुरूच्या जगजीवन राम नगर परिसरात ओम शक्ती मंदिराची शोभायात्रा सुरू असताना रथ ओढणाऱ्या भाविकांवर दगडफेक झाल्याची घटना घडली. रविवारी रात्री घडलेल्या या प्रकारात दगडफेकीत एका मुलीला (किंवा काही वृत्तांनुसार महिला) दुखापत झाली. तिच्या डोक्याला दुखापत झाली आणि तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. जखमी व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल माहिती उपलब्ध नाही.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रथयात्रेदरम्यान दगडफेक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली आहे. या घटनेनंतर संतप्त भाविक मोठ्या संख्येने जगजीवन राम नगर पोलिस ठाण्यासमोर जमा झाले आणि दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत जोरदार निदर्शने केली. यापूर्वीही अशा घटना घडल्याचा दावा आंदोलकांनी केला.

भाविकांच्या मागणीनंतर पोलिसांनी तात्काळ एफआयआर दाखल केली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पश्चिम विभागाचे उपायुक्त (डीसीपी) यतीश एन. बी. यांनीही पोलिस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

पोलिसांनी सांगितले की दोषींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून ओळख पटताच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande