भारतावर लावलेले टॅरिफ आणखी वाढवले जाऊ शकतात-ट्रम्प
नवी दिल्ली , 05 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाविरोधात केलेल्या कारवाईनंतर ते सध्या चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भारतासंदर्भात एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी भारताला इशारा देत सांगितले की,
भारतावर लावलेले टॅरिफ आणखी वाढवले जाऊ शकतात-ट्रम्प


नवी दिल्ली , 05 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाविरोधात केलेल्या कारवाईनंतर ते सध्या चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भारतासंदर्भात एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी भारताला इशारा देत सांगितले की, भारतावर लावलेले टॅरिफ आणखी वाढवले जाऊ शकतात. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रशियाचाही उल्लेख केला.

ट्रम्प यांनी यापूर्वी भारतासह अनेक देशांवर टॅरिफ लावले होते. विशेष म्हणजे भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लागू करण्यात आला होता. अहवालानुसार, भारतावर टॅरिफ लावण्याचा उल्लेख करताना ट्रम्प म्हणाले, “या मुद्द्यावर ते खरे तर मला खूश करण्याचा प्रयत्न करत होते. पंतप्रधान मोदी हे खूप चांगले व्यक्ती आहेत, ते एक उत्तम माणूस आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे मी नाराज आहे, हे त्यांना माहीत होते. मला खूश करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. जर भारताने रशियन तेलाची खरेदी सुरूच ठेवली, तर आम्ही त्यांच्यावर लवकरच टॅरिफ वाढवू शकतो.”

खरेतर, ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावले होते. भारत आणि रशिया यांच्यातील तेल व्यापाराबाबत ते नाराज होते आणि त्यांनी याचा अनेकदा उल्लेखही केला होता. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील व्यापार करार (ट्रेड डील) बराच काळ प्रलंबित राहिला होता. ट्रम्प यांची इच्छा होती की भारताने आपला संपूर्ण बाजार अमेरिकेसाठी खुला करावा तसेच दुग्धव्यवसाय आणि कृषी क्षेत्रात अमेरिकेला प्रवेश द्यावा. मात्र, भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला.

भारत आणि रशिया यांचे संबंध अनेक वर्षांपासून चांगले असून दोन्ही देशांमध्ये व्यापारही सुरू आहे. ट्रम्प यांची नाराजी याच कारणामुळे असल्याचे दिसून येते आणि त्यांच्या ताज्या विधानातही याचा उल्लेख आहे.दरम्यान, सध्या ट्रम्प व्हेनेझुएलामध्ये करण्यात आलेल्या एका ऑपरेशनमुळेही चर्चेत आहेत. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली असून त्यांच्याविरोधात आता न्यायालयीन कारवाईही सुरू करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande