
नवी दिल्ली, 05 जानेवारी (हिं.स.)। दिल्ली दंगली प्रकरणात सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या जामीन अर्जांना नकार दिला. या निर्णयावर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल राहुल गांधी आणि काँग्रेसच्या संपूर्ण परिसंस्थेसाठी मोठा धक्का आहे. असे भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले .
पूनावाला म्हणाले की, आज सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निर्णय आला असून, त्यामुळे देशाचे तुकडे-तुकडे करण्याचा विचार करणाऱ्या टोळीला मोठे दु:ख आणि वेदना होत आहेत. त्यांनी ज्या प्रकारे ही कृत्ये केली, त्यावरून हे स्पष्ट होते की दिल्लीतील दंगे हे केवळ संयोग नव्हते, किंवा अचानक घडलेले प्रयोग नव्हते; तर मी असे म्हणेन की ते हिंदूविरोध आणि मतपेढीच्या राजकारणातून उभा राहिलेला एक मोठा उपक्रमच होता.
ते पुढे म्हणाले की, झालेले दंगे पूर्णपणे सुनियोजित होते. उल्लेखनीय म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने २०२० च्या दिल्ली दंगलींच्या कटप्रकरणात आरोपी असलेल्या उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले की, त्यांच्या विरोधात गैरकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम म्हणजेच यूएपीए अंतर्गत प्रथमदर्शनी ठोस पुरावे आहेत. मात्र, याच प्रकरणातील इतर पाच आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule